हिवरखेड (धीरज बजाज)- नांदुरा येथील तीन वर्षीय चिमुरडीवर पाशवी अत्याचार करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करीत त्या हैवानाला तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी करीत आदीवासी समाज संघटना, अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद नवी दिल्ली यांच्या पुढाकारातून महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी यांना उपविभागीय अधिकारी आकोट यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील आदीवासी टाकणकार पारधी समाजातील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करूण फाशी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या हैवान नराधमाला पास्को न्यायालय अंतर्गत खटला चालवून ३ महीण्याच्या आत तात्काळ फाशी देण्यात यावी व आदीवासी कुंटूबांला तातडीने न्याय मिळावा. अशी मागणी सर्व आकोट तालूका व मेळघाट मधील आदीवासी बांधवांनी केली आहे.
निवेदन वेळी सर्व जमातीचे आदीवासी कार्यकारी पदाधिकारी हजर होते. या जघण्य घटनेचा सर्वत्र जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे सर्व आदीवासी समाज़ात हळहळ व्यक्त होत आहे . यावेळी शाखा आकोला चे जिल्हा कार्याध्यक्ष डीगांबर रा. सोळंके वस्ताद, मेळघाट चे आदीवासी नेते हंबीरराव मोरे, माजी जि.प .सदस्य, पश्चिम विदर्भ भील संघटनेचे अध्यक्ष देवीदास भास्कर, आदीवासी समाज सेवक संजय भाऊ गायधर सरपंच वस्तापूर, राजेन्द्र मोरे जि. प. सदस्य, मुरलीधर खोटे पं.स. सदस्य, राधेशाम चांमुळकर पं.स. सदस्य, हरदीप खानंदे समाज सेवक, मंगेश चव्हाण, प्रविण चव्हाण, संतोष खानंदे, आदीवासी सेवक सुभाष भाऊ भोयर गुल्लरघाट पुर्नवसन संघर्ष योद्धा, सुरेश भाऊ नेवारे, अर्जुन मांगाडे गुल्लरघाट पुर्नवसन संघर्ष योद्धा, सामाजीक कार्यकर्ता रोशन भाऊ कुचेकर, प्रज्वल बरबरे, रुपेश दादा धांडे, सुरजभाऊ नाथे, असे अनेक समाज बांधव निवेदन देतेवेळी हजर होते.