अकोला:- (सुनिल गाडगे)
कृषि विद्यापीठातील इमारती, भवन, वस्तीगृह ने covid सेंटर विलगीकरणासाठी आणि उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने विद्यापीठ प्रशासना मार्फत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे. सध्यास्थितीत वस्तीगृहात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. परंतू विद्यार्थ्यांचे सर्व सामान, मुळ कागदपत्रे, नोट्स इत्यादी वस्तू वस्तीगृहत आहेत. त्यापैकी काही वस्तू या चोरीला जात आहे असा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांचे मुळ दस्ताऐवज कृषि विद्यापीठातील वस्तीगृहात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांची आयुष्याची जमापुंजी म्हणजे विद्यार्थ्यांचे मूळ दस्तावेज गहाळ होण्याची भीती विद्यार्थ्यांना भासत आहे.असे झाल्यास विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक जीवनाचे मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. दस्तावेज जर गहाळ झाले तर विद्यार्थ्यांला पुढील शिक्षणासाकरिता कुठेही प्रवेश मिळणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे . विद्यार्थ्यांना त्यांचे मूळ दस्ताऐवज एका आठवड्याच्या आत सुपूर्द करून विद्यार्थ्यांना या अडचणीतून बाहेर काढून दिलासा द्यावा .सद्य परिस्थिती माहीतच आहे. कोरोना या जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झाले आहे तसेच या जाचातून आपले विद्यापिठ यंत्रणा देखील अलिप्त राहली नाही , त्यामुळे 2019-20 मधील प्रथम वर्षांतील प्रथम सत्र , द्वितीय वर्षातील तृतीय सत्र , तृतीय वर्षांतील पाचव्या सत्र यांची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे या करिता अभाविप ने आधी पण आपणाला निवेदन देण्यात आले आहे परीक्षा शुल्क परत करण्या बाबद पण आपण अद्याप ही उत्तर दिले नाही.
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या अधिकारा नुसार परीक्षा शुल्क ठरवण्याचा किंवा माफ करण्याचा अधिकार हा विद्यापीठाला आहे तरी आपण आतापर्यंत निर्णय घेतला नाही याचे उत्तर आपण आम्हाला द्यावे .
चालू शैक्षणिक सत्र 2019 – 20 या सत्रात वस्तीगृहात मागील चार ते पाच महिन्यापासून विद्यार्थी वसतिगृहात नाहीत त्यामुळे त्यांचे वस्तीगृह शुल्क देखील परत करण्यात यावे वस्तीगृह शुल्क आकारणे म्हणजे न घेतलेल्या वस्तू चे शुल्क आकारण्या प्रमाणे आहे .
आपणास विनंती आहे की आपण या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे
अशी मागणी अ भा वी प अकोला नी विद्यापीठ प्रशासनाला केली , ही मागणी केली व मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करेल असा इशारा अभाविप महानगर मंत्री अभिषेक देवर यांनी दिला ,निवेदन देते वेळी आदित्य केंदळे , अनिकेत पजई ,अविनाश तोडसाम , ऋषिकेश सुबुगडे , प्रतीक देवतळे , शक्ती केराम उपस्थित होते.