अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, समुपदेशनाद्वारे ३ जुलै व ५ आॅगस्ट रोजी कर्मचाºयांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी दिला.
शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील वर्ग-३ व वर्ग -४ मधील संवर्गाच्या कर्मचाºयांच्या प्रशासकीय आणि विनंतीनुसार सार्वत्रिक बदली प्रक्रिया २७ व २८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती; मात्र जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातील एक परिचर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, जिल्हा परिषद कर्मचाºयांची बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या सार्वत्रिक बदली प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक २७ जुलै रोजी निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाºयांची समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया ३१ जुलै व ५ आॅगस्ट रोजी राबविण्यात येणार असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे.
बदली प्रक्रियेचे असे आहे वेळापत्रक!
३१ जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, अर्थ, पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. तर ५ आॅगस्ट रोजी आरोग्य, पंचायत विभाग, शिक्षण व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांची समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे.