मूर्तिजापूर (सुमित सोनोने)- 24 जुलै सकाळी .9:30 वाजताच्या दरम्यान एंण्डली ता.मुर्तीजापुर जिल्हा अकोला येथील दादाराव वानखडे अंदाजे वय 60 वर्षे हे म्हशींना पाणी पाजण्यासाठी गावा लगतच्या पुर्णानदीपात्रात गेले असता यावेळी पुर्णानदीच्या पुरात वाहून गेले होते.* याची माहिती तहसीलदार मुर्तीजापुर यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दीली आणी सर्च ऑपरेशन साठी येण्याचे सांगितले काल दुपार पासुन सर्च ऑपरेशन चालु केले असता आज अखेर संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर यांच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आज दुपारी 1:30 वाजता पुर्णानदी पात्रातील पुरात दादाराव वानखडे यांचा मृतदेह पिंजर येयील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे आजची टीम नंबर दोनचे जवान अंकुश सदाफळे, विकी साटोटे,अतुल उमाळे,ऋषीकेश तायडे, धिरज आटेकर,बबलु पवार आणी दोनवाडा येथील श्रीकृष्ण झटाले पाटील,प्रमोदभाऊ आडे, देवानंद झटाले,संतोष आडे,भगवान जामनिक, पवन झटाले,वैभव बचे यांनी मृतदेह पकडला मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत असल्याने पथकाच्या जवानांना दोनवाडा गावात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दोन दीवसाच्या अथक प्रयत्नानंतर पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात आजची टीम नंबर एक चे ज्ञानेश्वर म्हसाये,अजय जाधव, सूरज ठाकुर,सागर आटेकर,मयूर कळसकार, मयूर सळेदार,अजय डाके, गोकुल तायडे, ऋतीक सदाफळे,शरद महल्ले, कैलास वानखडे,
सर्च ऑपरेशन चालु होते सोबत आज शासकीय टीमचे तलाठी सुनील कल्ले,तलाठी हरीहर निमकंडे, आणी अंकुश डोंगरे व सहकारी. यांनी आज सकाळ पासुन दोन रेस्क्यु बोटने एंण्डली पासुन सर्च ऑपरेशन चालु केले असता रेस्क्यु बोट लाखपुरी पर्यंत येताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीम नं 2 यांनी व दोनवाडा येथील नागरिकांच्या मदतीने मृतदेह पकडल्याची माहीत पथकाच्या जवानांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली. आणी लगेच दीपक सदाफळे यांनी सर्च ऑपरेशन लाखपुरी जवळ थांबविले. विशेष म्हणजे एंण्डली गावातील स्थानीक नागरीकांनी तीन दीवस मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य केले. या मोहीमेत अकोला आर.डी.सी. संजयजी खडसे सर, एस.डी.ओ. मोहीते साहेब मुर्तीजापुर, तहसीलदार पवार साहेब, नायब तहसीलदार डाबेराव साहेब, पि.आय.खंडारे साहेब पो.स्टे.माना, भारती तलाठी एंण्डली, हे दोन दीवसाच्या सर्च ऑपरेशनवर लक्ष ठेऊन होते हे विषेश.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली.