अकोला – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे,’बार्टी’ महासंचालक कैलास कणसे,समतादूत प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्या मुख्य मार्गदर्शनात अकोला जिल्हातील समतादूत यांचे मार्फत आपल्या तालुका कार्यक्षेत्रातील ५९ अनुसूचित जातीतील गावनिहाय कुटुंब व सदस्य संख्या किती हे माहिती संकलनाचे कार्य सुरू आहे.
समतादूत यांचेमार्फत आतापर्यंत अकोला जिल्हातील ३४७ गावामधील ५९ अनुसूचित जातीतील माहिती संकलित केली आहे.कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती असल्याने शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून समतादूत ही माहिती संकलित करत आहेत.
अकोला जिल्हातील आपल्या तालुका कार्यक्षेत्रात कार्य करणारे समतादूत ज्यामध्ये रविना सोनकुसरे,वैशाली गवई अकोला,मनेश चोटमल मूर्तिजापूर,उपेंद्र गावंडे,विनोद सिरसाट बार्शीटाकळी,समता तायडे पातूर,प्रज्ञा खंडारे,स्मिता राऊत बाळापूर,शुभांगी लव्हाळे तेल्हारा,बालाजी गिरी अकोट हे माहिती संकलित करण्याचे कार्य करत आहेत.