अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमिवर डोंगरगाव येथील गरीब कुटुंबातील ‘स्मार्टफोन ’ नसलेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्टया दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परीक्षेचे ‘आॅनलाइन’ धडे देण्यात येत आहेत. गावातीलच एका खोलीत ई-लर्निंग टीव्ही संचाद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याची व्यवस्था अकोल्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलच्यावतीने करण्यात आली आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेले डोंगरगाव येथील सहा विद्यार्थी यावर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा देण्याची तयारी करीत आहेत. गरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन ’ नसल्याच्या परिस्थितीत गरीब व हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे ‘लॉकडाऊन’ होऊ नये, यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूलच्यावतीने तंत्रस्रेही शिक्षक शशिकांत बांगर यांनी ई-लर्निंग टीव्ही संच तयार केला. डोंगरगाव येथील सुभाष काकडे यांच्या सहकार्याने गावातीलच एका खोलीत ई-लर्निंग टीव्ही संच लावून, त्याद्वारे स्मार्टफोन नसलेल्या गावातील सहा विद्यार्थ्यांना २६ जूनपासून शिष्यवृत्ती परीक्षेचे आॅनलाइन धडे देण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांना गावातच आॅनलाइन शिक्षण घेण्याची व्यवस्था उपलब्ध झाली. शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांना १४ जुलैपासून ई-लर्निंंग टीव्ही संचाद्वारे नियमित शिक्षणाचे धडेदेखिल देण्यात येत आहेत.
डोंगरगाव येथील गरीब कुटुंबातील स्मार्टफोन नसलेल्या सहा विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परीक्षा देणाºया इयत्ता आठवीतील सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृती परीक्षासह नियमित शिक्षणाचे आॅनलाइन धडे देण्यासाठी न्यू इंग्लिश हास्कूलच्याववतीने गावातच ई-लर्निंग टीव्ही संच लावण्यात आला आहे. त्याद्वारे गरीब विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-माधव मुन्शी
प्राचार्य, न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अकोला.