अकोट (प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा अकोट तालुका तर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर आणि आ.प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या मार्गदर्शनात व भाजप अनु जा जमातीचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ पवार युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीणभाऊ डिक्कर यांच्या नेतृत्वात
भाजयुमो अकोट तालुका अध्यक्ष गोपालभाऊ मोहोड यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन *तालुक्यातील एदलापूर खैरखेड चिपी धोंडाआखर येथील पराटी पिकांवर मर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शेतकरी राजा संकटात आला आहे तसेच आदिवासी भागातील फळ बाग योजनेतील २०१८ पासून लागवड केलेले रोप व खतांचे पैसे देखील अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही आहे तसेच २०२० मधील पीक विमा मधून ही काही शेतकऱ्यांचे नाव गहाळ झाले आहे तत्काळ या समस्येवर तोडगा काढवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा युवा मोर्चा तर्फे देण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ पवार,जिल्हासरचिटणीस प्रवीण डिक्कर,युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष देवानंद भारसाकळे,महेश ताडे,युवा मोर्चा अकोट तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड,चेतन मर्दाने,निलेश नवघरे, अभिजित निचळ,ज्ञानेश्वर डिक्कर,शंतनु चरपे,रोहन वानखडे,शाहुल ताराळे,दिनेश मावसे,विशाल भारसाकळे,आकाश जवंजाळ,जयप्रकाश गव्हाळे,मंगेश मेहरे,नवनीत गावंडे किशोर देवगिरे निवृत्त गडम गणेश रेळे व कार्यकर्ते उपस्थित होते.