• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आयपीएल २०२० ची फायनल केव्हा अन केव्हा जाणार UAE भारतीय संघ

Media Desk by Media Desk
July 24, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
ipl 2020
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यानंतर आता उत्सुकता लागलीय की खऱ्या अॅक्शनची. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2020 संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे होणार असून 19 सप्टेंबरला पहिला सामना रंगणार आहे. यंदाची आयपीएल यूएईत होणार असल्याचे आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आधीच जाहीर केलं होतं. आता पुढील आठवड्यात संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे.  आतापर्यंत आयपीएल 26 सप्टेंबरला होईल, अशी चर्चा होती. पण, PTI ला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की ही स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरू होणार असून 8 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 3 डिसेंबरला कसोटी मालिका सुरू होणार असून त्यापूर्वी टीम इंडियाला 14 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. आयपीएल 19 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता अधिक आहे आणि 8 नोव्हेंबर ( रविवारी) अंतिम सामना होईल. आयपीएलसाठी 51 दिवस आम्हाला मिळत आहेत आणि फ्रँचायझी व ब्रॉडकास्टर अन् अन्य भागधारकही या तारखांवर समाधानी होतील, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं PTIला सांगितले. ते पुढे म्हणाले, 51 दिवस मिळत असल्यानं कमीच डबल हेडर सामने होतील.

सात आठवड्यांच्या या कालावधीत आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्ही पाचच डबल हेडर खेळवू. त्यामुळे सरावासाठी खेळाडू महिनाभर आधी म्हणजेच 20 ऑगस्टला यूएईला रवाना होतील.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आयपीएलसाठी बीसीसीआयची विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू

ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाचे आयोजन आयसीसीने पुढे ढकलले आणि बीसीसीआयला दिलासा मिळाला. आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पण, यासाठी बीसीसीआयने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने यंदाच्या परदेशवारीसाठी विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरू केलेली असल्याची माहिती पुढे आली आहे. बीसीसीआयचे काही अधिकारी ‘एमिरेटस्’ आणि ‘इत्तेहाद’ या विमान कंपनीसोबत चर्चा करत आहेत. ऑगस्ट महिन्यात खेळाडूंना भारत ते युएई प्रवास करायचा असेल तर विमानांचे बुकिंग व इतर गोष्टींवर काम सुरू झाल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले. दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा विविध आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खेळाडूंना युएईमध्ये न्यावे लागेल. यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जात आहे. खेळाडूंव्यतिरिक्त बीसीसीआयचे काही अधिकारी दुबई, शारजा आणि अबू धाबी येथे तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा घेणार आहेत. ‘आयोजनाच्या बाबतीत आयपीएलची वेगळी ख्याती आहे. त्यामुळे यंदा युएईमध्ये स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

Tags: आयपीएलआयपीएल 2020
Previous Post

रिधोरा येथे ग्राम पंचायत उपसरपंच मंगेश भाऊ गवई यांच्या  वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा…

Next Post

डीआरडीओ ने लेह इथल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च संस्थेमध्ये कोविड-19 ची चाचणी सुविधा सुरू केली

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
डीआरडीओ

डीआरडीओ ने लेह इथल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च संस्थेमध्ये कोविड-19 ची चाचणी सुविधा सुरू केली

रुग्ण

एका दिवसात सुमारे 30,000 रुग्ण बरे झाले, एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा, एकूण बरे झालेले रुग्ण 7.82 लाखाहून अधिक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.