अकोला (प्रतिनिधी)- “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करून तमाम भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यप्राप्ती साठी नवचेतना जागृत करणारे व सार्वजनिक गणपती मंडळाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती 23 जुलै रोजी ब्राह्मण महासंघाच्या वतीने साजरी करण्यात आली.
स्थानिक मनपा च्या शेजारी असलेल्या टिळक स्मारक पुतळ्याला माल्यार्पण करून लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले.
सदर पुतळ्याची छत्री नाहीशी झालेली आहे, यावेळी महासंघाच्या वतीने नवीन छत्री एक महिन्यात तयार करून लावण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. तसेंच 23 जुलै रोजीच थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची सुद्धा जयंती असते , या प्रसंगी चंद्रशेखर आझाद यांचे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली .
सदर पुतळ्याच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असतें तसेंच रेलिंग तुटले आहे , त्यामुळे महासंघ वरील पुतळा व परिसर याच्या संवर्धनाची मागणी मनपा प्रशासनाकडे करणार आहे व पूर्ण जबाबदारी घेणार आहे.
प्रसंगी मा.श्री अमोलजी चिंचाळे गुरूजी पु.आ.कार्याध्यक्ष, श्री समीरजी अयाचित, प्रमोदजी देशपांडे, प्रमोद जोशी ,प्रशांत कूलकर्णी,लक्ष्मीकांत रेलकर, अनिलजी धर्माधिकारी, गजाननं मामू, तन्मय अग्नीहोत्री, बंडोपंत जोशी, शुभम जोशी, रोहीत देशमुख, प्रसाद पाठक, यशोधन गोडबोले निलेश जोशी गीरीश जोशी व अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी वृत्तपत्र वितरण महासंघाचे बी. संतोषकुमार व विनायक जपूलकर यांनी वंदेमातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. असे अकोला जिल्हा सचिव शशिकांत पांडेकाका, यांनी कळवले आहे .