पातूर (सुनिल गाडगे): पातुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर घाटाचे वर माळराजुरा फाट्याचे अलीकडे आज दिनांक २१/ ७/ २०२० चे दुपारी चार वाजताच्या सुमारास वाशिम वरून जोगदंड ॲम्बुलन्स सर्विस ची ॲम्बुलन्स क्रमांक MH०४.. ५३९ क्रमांकाची अंबुलन्स ही पेशंट आणि त्याचे सहकारी यांना अकोला येथे घेऊन जात असतांना पातुर कडून मालेगाव कडे जात असलेल्या ट्रक क्रमांक HR ६९ B.. ६६३३ मध्ये जबर धडक झाली . ही धडक इतकी भीषण होती की घटनास्थळी रुग्णवाहिकेचा संपूर्ण पूर्णतः चेंदामेंदा झाला असून त्यामध्ये दोन जण मृत्यू पावलयाची प्राथमिक माहिती असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती पातुर पोस्ट पोलिस स्टेशनला मिळतात पातुर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन गंभीर जखमी ला जिल्हा सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती पातुर पोलिसांकडून प्राप्त झालेली आहे या भीषण अपघातांमध्ये या मधे चंद्रकांत घनशाम वटेकर वय २८वर्ष ,व वाल्मीक तुरक वय ५० हे मृत पावले असून सौ.सुरेखा वाल्मिकी तूरक वय ४५,अनिकेत वाल्मिकी तुरक वय २३, अंकुश विश्वास तुरक वय २५, पवन विष्णु शिंदे वय २३. हे जखमी झाले असून . ॲम्बुलन्स ड्राइवर विनोद राजू डोलारकर वय २९ , रा.मानोरा तसेच ॲम्बुलन्स सहायक संभाजी गायकवाड वय 25 रा. जांभरून ता.वाशीम हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन सिंह बायस ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत