• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समिती बैठक: केंद्रीय राज्यमंत्री ना.धोत्रे यांनी घेतला आढावा

Media Desk by Media Desk
July 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
ना.धोत्रे
16
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२१– केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीची (दिशा) सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाली. ना. धोत्रे यांनी केंद्र शासनाच्या  विविध योजनाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महापौर अर्चनाताई मसने, आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्रशासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा सादर करण्यात आला. त्यात राष्ट्रीय भूमी अभिलेख विभागाकडून भूमी अभिलेखा आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत १०० टक्के अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.  तसेच जिल्ह्यात ८७ हजार६९७ मिळकत पत्रिका असून  त्यांच्या संगणकीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मागणीनुसार त्या जनतेत वितरीत करण्यात येत असतात, असे सांगण्यात आले.

पंडीत दीन दयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गंत माळेगाव बाजार, पिंपरी खुर्द, अकोली जहागीर, कान्हेरी सरप व कुरम येथील नवीन पाच उपकेन्द्राचे काम पूर्ण करण्यात आले असून उपकेन्द्र कार्यन्वीत झाले आहे. तसेच उपकेन्द्र रोहित्रांची क्षमता वाढ करण्यामध्ये माना, कारंजा रमजान पुर, पिंजर व निंबा येथील चारही उपकेन्द्राची क्षमता वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांनी दिली.

अकोला येथील रेल्वे मालधक्का स्थलांतर त्वरीत बोरगांव मंजू येथे करण्यात यावे, अशा सूचना मा. धोत्रे यांनी रेल्वे विभागाला दिल्या. डाबकी रोड येथील उड्डाण पुलाचे काम त्वरीत पूर्ण करावे. तसेच अकोला रेल्वे स्टेशन आधुनिकीकरणासाठी सुरु असलेले कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पुरवठा योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, पंडीत दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, समग्र शिक्षा अभियान योजना, एकात्मीक बाल विकास योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय स्वास्थ मिशन योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायक कार्यक्रम आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Tags: ना.धोत्रे
Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथास हिरवी झेंडी

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ६११ चाचण्या, २२ पॉझिटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona-test-lab

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ६११ चाचण्या, २२ पॉझिटिव्ह

patur-ambulance-accident

पातुर घाटामध्ये रुग्णवाहिकेला भीषण अपघात; अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.