अकोला,दि.२१– राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बुधवार दि. २२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा बुधवार दि.२२ व गुरुवार दि.२३ रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
बुधवार दि. २२ रोजी– सकाळी १०.५० वा. अकोला येथे आगमन. सकाळी ११ वा. श्री राजराजेश्वर कावड जलाभिषेकबाबत चर्चा,
दुपारी १२ वा. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील कोविड-१९ बाबत आढावा बैठक
दुपारी एक वा. पाच टक्के अंपग निधी खर्चबाबत आढावा बैठक.
दुपारी दोन वा. राखीव.
दुपारी तीन वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्षांच्या जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत बैठक.
सर्व बैठकांचे स्थळः- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,
दुपारी चार वा. मौजे वसाळी, ता. पातूर जि. अकोलाकडे प्रयाण.
सायं.सहा वा.मौजे वसाळी येथे आगमन व गावकऱ्यांसोबत स्थानिक समस्यांबाबत चर्चा व संवाद.
सायं. सात वाजता राखीव व मुक्काम.
गुरुवार दि. २३ रोजी सकाळी नऊ वा. मौजे वसाळी, ता.पातूर येथील रस्त्याचे भुमिपूजन सोहळ्यास उपस्थिती.
सकाळी ११ वा. मौजे पांढुर्णा-सोनुना-चोंढी, ता. पातूर. या गावास भेट, नागरिकांशी स्थानिक समस्येंबाबत चर्चा/संवाद व चोंढी धरण पाहणी.
दुपारी एक वा. मौजे. महान, ता. बार्शिटाकळी (काटेपुर्णा धरण) कडे प्रयाण
दुपारी तीन वा. आगमन व पाटबंधारे, सिंचन विभागाच्या अधिकारी यांचे समवेत चर्चा.
दुपारी चार वा. अकोलाकडे प्रयाण.
सायंकाळी पाच वा. शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन व सवडीने कुरळपूर्णा, जि. अमरावती कडे प्रयाण.