तळेगाव बाजार (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथे दररोज पहाटे पाच वाजता गुराचि अवैध कत्तल होत असल्याची माहिती हिवरखेडचे ठाणेदार आषिश लवगंडे यांना मिळताच त्यांनी धाड टाकून दोन आरोपि सह साठ किलो गोमांस जप्त केले आहे. तळेगाव बाजार हे बनले अवैध कटाई केन्द्र असे वृत्त प्रकाशित झाले होते तब्बल एक महिना नंतर हिवरखेडचे ठाणेदार आषिश लवगंडे व त्यांचे पोलिस कर्मचारी यानि दि 21जुल्ई रोजी पहाटे पाच वाजता तळेगाव बाजार येथील शे तोहसिन शे नूरा वय 30 , शे रेहान शे हुसेन वय 27 या दोन आरोपींना त्याचे घरि अवैध कत्तल करताना रंगेहाथ पकडुन घटना स्थळावरुन साठ किलो गोमांस जप्त करण्यात आले सदर गोमांस तपासणी साठी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडे पाठवुन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी तळेगाव बाजार येथे अवैध कत्तल चे तिन केंद्र आहेत येथे कत्तल होऊन आजुबाजूच्या सहा गावात गोमांस पुरवठा करण्यात येतो या आधि सहा महिन्यांत दहाते पंधरा गाई चोरी गेल्या परंतु हिवरखेड पोलिस स्टेशन मध्ये सदर माहिती मिसिंग म्हणून घेण्यात आली तर दोन महिन्यां आधि येथिल गाय चोरणाऱ्या दोन आरोपींना पारळा येथिल नागरिकांनीगाय चोरी करताना तेल्हारा पोलिसांचे ताब्यात दिले होते मात्र तरीही येथे अवैध कत्तल केली जाते सदर कारवाई बि ट जमादार संजय महल्ले निलेश बोरकुटे गिरिधर चव्हाण श्रीकृष्ण सोळंके महिला पोलिस प्रणिता वाशिमकर यांनी केली आहे धाड पडल्यानंतर हि गावात मटन विक्री खुलेआम सुरू होति हे मात्र विशेष आहे.
तळेगाव बाजार येथे दररोज पहाटे गुराचि अवैध कत्तल केली जाते मात्र सदर गुरे चोरिचे जणावरे आणले कोठुन एकाही जनावरे चि पावती नसल्याने पोलिसांनी तोही तपास करुन आरोपी विरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
आज पर्यंत शेकडो गोवंश गायब
हिवरखेड पोलीस स्टेशन अंतरर्गत येणाऱ्या गावांमधून या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात गोवंश चोरीच्या घटना घडल्या असून खुद्द आज ज्या गावात कारवाई झाली त्या गावातील लागोपाठ अनेक गायी चोरी गेल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.मात्र याबाबत तक्रार केली असता कुठली चॉकशी न करता प्रकरण गुलदस्त्यात राहले आहे.
तळेगाव बाजार येथे दररोज पहाटे गुराचि अवैध कत्तल केली जाते मात्र सदर गुरे चोरिचे कि जणावरे आणले कोठुन एकाही जनावरे चि पावती नसल्याने पोलिसांनी तोही तापास करुन आरोपी विरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे