तेल्हारा(प्रतिनिधी)- एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले असून आज तालुक्यातील ग्राम शेरी बु येथील अठरा वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
ग्राम शेरी बु येथील विजय अघम यांच्या अठरा वर्षीय मयूर ह्या मुलाने आज टोकाचे पाऊल उचलले आज पाच वाजेच्या दरम्यान राहत्या घराच्या मागे झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली मयूर हा हुशार तसा मनमिळाऊ असा होता त्यासोबतच तो पोलीस भरती या सारखे ध्येय ठेऊन आपले जीवन जगत होता मात्र आज सायंकाळी त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली मयूर हा घरात सर्वात लहान होता त्याच्या या टोकाच्या पाउलाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्राथमिक माहितीनुसार त्याला पोटाचा आजार होता अशी माहिती पोलिसांकडून मिळाली असून पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विजय खेकडे हे करीत आहेत.