तेल्हारा : शासनाच्या नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीची प्रक्रिया तेल्हारा खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरू केली होती. शेतकºयांना विक्री केंद्रावर माल घेऊन येण्यासाठी संदेशही पाठविण्यात आले; परंतु संस्थाचालकांच्या अंतर्गत वादामुळे ही खरेदी बंद पडली. गत २0 दिवसांपासून अडीचशे शेतकºयांचा हजारो क्विंटल हरभरा वाहनांमध्ये पडून आहे. पावसामुळे हरभरा भिजला असून, शेतकºयांच्या मालाचे नुकसान होत आहे. शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकºयांच्या शेतमाला भाव मिळावा, यासाठी शासनाने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू केले. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाफेडने खरेदी-विक्री सहकारी संस्थेला सब एजंट नियुक्त केले. शेतकºयांनी नाफेड केंद्रावर हरभरा, तूर विक्रीसाठी आणावी, यासाठी खरेदी-विक्री संघाने नोंदणी केलेल्या शेतकºयांना मोबाइलद्वारे संदेश पाठविले खरे. त्यानुसार शेकडो शेतकरी केंद्रावर भाड्याच्या वाहनाने, ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे शेतमाल घेऊन मोजणीसाठी हजर झाले; परंतु खरेदी-विक्री संघाच्या संचालकांमध्ये अंतर्गत वादामुळे २0 दिवसांपासून खरेदी बंद पडली. त्यानंतर पुन्हा खरेदी सुरू करण्यात आली. १५ जुलै ही खरेदीची अंतिम तारीख असल्याने ५, १३ व १४ जुलै रोजी शेतकºयांना संदेश पाठविण्यात आले. त्यानुसार शेतकरी ६ जुलैपासून हरभरा घेऊन नाफेड केंद्रावर हजर झाले. हरभºयाची मोजणी संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी हरभºयाचे मोजमाप होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. १४ व १५ जुलै रोजी जोरदार पाऊस पडला. तेव्हापासून हरभरा खरेदी ही बंद पडली आहे. हरभरा मोजणी सुरू होईल, याची प्रतीक्षा असल्याने, शेकडो शेतकºयांच्या हरभºयासह भाड्याच्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या आहेत. पावसामुळे अनेक शेतकºयांचा हरभरा भिजला असून, शेतकºयांचे नुकसान होत आहे. आधीच निसर्गाच लहरीपणा, बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात नाफेडच्या अंतर्गत राजकारणामुळे शेतकरी भरडला जात आहे.
खरेदीसाठी भाजपचे आंदोलन
भाजप पदाधिकाºयांनी खरेदी-विक्री संघाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाºयांना खरेदीबाबत तोडगा काढून माल खरेदी करण्याचे निर्देश दिले आणि खरेदी-विक्री संघाच्या उपाध्यक्षांसोबत चर्चा करीत, अंतर्गत वाद बाजूला ठेवून रखडलेली खरेदी सुरू करण्यास बजावले.
जेसीबीने काढताहेत ट्रॅक्टर
बाजार समितीच्या आवारात पावसामुळे चिखल साचला असून, या चिखलात शेतकºयांचे ट्रॅक्टर फसले आहेत. हे ट्रॅक्टर-ट्रॉली जेसीबीद्वारे काढण्यात येत आहेत. ट्रॅक्टरमधील हरभरा सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले आहे.
हरभºयाला फुटले कोंब!
नाफेड अंतर्गत मोजणी सुरू होईल, या आशेवर शेतकरी आहेत. त्यामुळे शेकडो मालवाहू वाहने, ट्रॅक्टर घेऊन मालासह नाफेड केंद्रावर २0 दिवसांपासून हरभरा मोजणीची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, आलेल्या पावसामुळे वाहने, ट्रॅक्टरमधील हरभरा भिजल्यामुळे हरभºयाला कोंब फुटले आहेत. शेतकºयांचे नुकसान झाल्यानंतर खरेदी-विक्री संघ हरभरा खरेदी करणार का, असा संतप्त सवाल शेतकºयांनी केला आहे.