अकोट (देवानंद खिरकर )- अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येत असलेल्या गट ग्रामपंचायत करतवाडी अंतर्गत येणाऱ्या धामणा गावामध्ये काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे तेथील उमेश कळसकार व निरंजन खडके यांचे राहते घर पूर्णतः कोसळून पडले आहे.गेल्या कित्येक वर्षापासून या गरिबांना कुठल्याच प्रकारे घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.उमेश कळसकार व निरंजन खोडके यांचे घर पावसामुळे पूर्णता पडल्यामुळे आज यांच्याकडे राहायला पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरे घर सुध्दा नाही.ते भूमिहीन असून शेतमजूर करून त्यांचा उदहर निर्वाह करतात.अशा परिस्थितीत त्यांचे हात मजुरी करून घर खर्च भागवतात.त्यांच्याकडे कुठलेही व्यवसायाचे दुसरे साधन उपलब्ध नाही.कित्तेक वर्ष झाले गावाचे रहिवासी असून सुद्धा आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही.त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोळी महासंघ अकोला जिल्ह्या कार्यकर्ता गणेश बुटे त्यांच्या गावामध्ये पोहोचले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच शासन दरबारी समस्या मांडणार व या समस्येतून लवकरच बाहेर काढणार असे आश्वासन गणेश बुटे यांनी त्यांना दिले.याकडे शासन व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष द्यावे.अन्यथा कोळी महासंघ अकोला आपला पुढील पवित्रा घेणार आहे.असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.यावेळी धामणा येथे प्रत्यक्षात कोळी महासंघ अकोला कार्यकर्ते गणेश बुटे,आदिनाथ खोबरखडे,अमोल बुन्दे,पुर्णा खोडके, यांनी गावामध्ये प्रत्यक्षात भेट दिली व इतर गावकरी सुद्धा उपस्थित होते.