दहीहंडा (कुशल भगत)- जिल्ह्यात तीन दिवसाचा लाॅकडाऊन जाहीर झाल्यानतंर लाॅकडाऊनचा गैरफायदा घेवुनअवैधरीत्या देशी दारूची विक्री करणारा विरूद्ध दहिहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी धडक मोहीम चालवत पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या पाटसुल रेल्वे,येथे मिळालेल्या गोपनीय माहीती वरून संजय भास्कर शेंगोकर वय ४५ वर्ष व उमेश भास्कर सुकोसे वय ३०वर्ष रा पाटसुल रेल्वे यांच्या कडुन अवैधरीत्या देशी विदेशी दारू बाळगतांना पचासमक्ष झाडाझडती घेतली असता देशी विदेशी दारूचा एकुण २१ हजाराचा मुदेमाल जप्त करण्यात आला.तर संजय भास्कर शेंगोकर वय ४५ याला ताब्यात घेण्यात आले. व उमेश भास्कर सुकोसे वय ३० हा परिस्थितिचा फायदा घेत तेथुन पळुन गेला दोघांन विरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.सदरची कारवाई अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली दहिहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे,सवदेकर दयाराम राठोड, सुभाष वाघ,यांनी केली आहे