अकोट (देवानंद खिरकर )- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपुर्ण जिल्ह्यात १८ ते २० जुलै तीन दिवस पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता,१५ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशा नुसार अकोट शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या ही वाढतच असल्याने नगर पालिका हद्दीती प्रतिबंधात्मक उपाय योजना कारण्याच्या दृष्टीने २० जुलै नंतर संबंधित उपविभागीय अधिकारी यांना आवश्यकता नुसार लॉक डाऊन वाढविण्याचे आदेश निर्गमित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले होते,त्यानुसार आज उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या आदेशानुसार अकोट शहरात १८ जुलै ते २२ जुलै पर्यंत या पाच दिवशी कडक लॉक डाऊन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे,यामध्ये अत्यावश्यक सेवा यांना वगळता कुठल्याही नागरिकांनी घराबाहेर निघू नये ,प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन स्थानीक प्रशासनातर्फे करण्यात आले.