तेल्हारा (योगेश नायकवाडे) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. व ही साखळी खंडित व्हावी तसेच लॉकडाउन मध्ये करण्यात आलेली शिथिलता त्यामुळे या महिन्यात येत असलेला संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा घरात राहूनच साजरा करावा असे आवाहन महात्मा फुले ब्रिगेड मार्फत करण्यात येते.
19 जुलै रोजी संत शिरोमणी सावता महाराज यांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा (पुण्यतिथी) असून दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तने, प्रवचने, अन्न दान, महाआरती यांचे भव्य आयोजन करून साजरा करण्यात येत असतो.
परंतु या वर्षी संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असल्यामुळे शासन व प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्याच प्राश्वभूमीवर शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर कडक केल्यामुळे सर्व समाजबांधवांनी भाविकांनी संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी घरातच प्रतिमपूजन, दीप प्रज्वलन करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करावी. तसेच कोरोना सारख्या महामारीच्या संकटात स्वतःची तसेच कुटुंब व आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन महात्मा फ़ुले ब्रिगेड चे जिल्हाअध्यक्ष अजयदादा बंड, तेल्हारा तालुका अध्यक्ष ऋषिकेश भाऊ निमकर्डे, तेल्हारा तालुका उपाध्यक्ष रोशनभाऊ बोंबटकार व तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.