मूर्तिजापूर (सुमित सोनोने)- मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हेंडज येथील इसमा विरुद्ध मूर्तिजापूरातील शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन ला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे त्याला अकोला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक हे मुर्तीजापूर तालुक्यातील तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याकरीता पेट्रोलींग व शोध मोहिम राबवीत असतांना त्यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,ग्राम हेंडज येथे तडीपार गुन्हेगार नामे सागर अजाबराव सोळंके,वय २८ वर्षे रा. हेंडज हा गावामध्ये त्याच्या राहत्या घरीच हजर आहे. या मिळालेल्या माहितीवरून हेडज येथे पोहचून सागर अजाबराव सोळंके याच्या घरून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीस उपविभागीय दंडाधिकारी मुर्तीजापूर यांचे आदेश क्रमांक पो अधि /क-५६/प्र.क ०१/१९ दिनांक-५/१०/२०१९ अन्वये दोन वर्षा करीता अकोला जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले होते.आरोपीविरुध्द पो स्टे मुर्तीजापूर शहर व ग्रामीण येथे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे, शरिराविरूध्द गुन्हे, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.थोडक्यात नमूद गुन्हेगार हा अकोला जिल्हयामधून दोन वर्षाच्या कालावधीकरीता तडीपार करण्यात आला असून विनापरवानगी त्याने अकोला जिल्हयात प्रवेश केला आहे. इसमाचे हे कृत्य कलम १४२ मुंबई पोलीस कायदा अन्वये होत असल्याने त्याच्या विरूध्द पो स्टे मुर्तीजापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही मा श्री जी.श्रीधर पोलीस अधीक्षक अकोला मा श्री प्रशांत वाघुडे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकूमार अ.बहाकर पोलीस निरिक्षक विशेष पथक व त्यांच्या पथकाने केली आहे.