• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

४२३ अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, २७ डिस्चार्ज

Media Desk by Media Desk
July 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
akola corona updates
12
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१७-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ४२३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४०२ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २०२६ (१९५९+६७) झाली आहे. आज दिवसभरात २७ रुग्ण बरे झाले,असून आता २६० जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६१४८   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १५६७१, फेरतपासणीचे  १६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१७  नमुने होते. आजपर्यंत एकूण १६०५३  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४०९४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १९५९आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज २१ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात २१ जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत.  त्यात अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा, पातूर, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  तर सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. ते  मोठी उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर,  मुर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

काल (दि.१६) रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्ट मधील ४६ जणांचे पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत केला आहे.

२७ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून २२ तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण २७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले तेल्हारा, मुर्तिजापूर आणि मलकापूर-अकोला येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या २२ जणांपैकी आठ जण बाळापूर येथील, पाच जण अकोट येथील,  चार जण महान येथील, दोन जण चांदूर येथील तर बार्शी टाकळी, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.

२६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २०२६(१९५९+६७) आहे. त्यातील ९९ जण (एक आत्महत्या व ९८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १६६७ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत २६० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

तेल्हारा तालुक्यात खुलेआम दारू विकणाऱ्यावर कारवाई तर तळीपार आरोपीला अटक,विशेष पथकाची कारवाई

Next Post

मुर्तीजापूर तालुक्यातील तडीपार गुन्हेगारास अटक, विशेष पथकाची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुर्तीजापूर news

मुर्तीजापूर तालुक्यातील तडीपार गुन्हेगारास अटक, विशेष पथकाची कारवाई

लाखपुरी

लाखपुरी येथील शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.