अकोला: सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी घोषित झाला. यंदा जिल्ह्याचा निकाल ९८ टक्के लागला असून, दहावी परीक्षेत जिल्ह्यातून मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्याचे निकालावरून दिसून येत आहे. स्कूल आॅफ स्कॉलर हिंगणा रोडची विद्यार्थिनी राजनंदिनी मानधने हिने ९९ टक्के गुण घेत अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ नोएल स्कूलची सायली खेडकर, एसओएसचा अमेय राठोड, ओम गायकवाड यांनी अनुक्रमे ९८.४0 टक्के गुण मिळविले. प्रभात किड्स स्कूलचा दीप उनडकाट याने ९८.0४ टक्के तर नोएल स्कूलचे रूजल गावंडे, प्रभातची आस्था लोहिया, ख्याती लोया, जवाहर नवोदय विद्यालयाची निकिता बंड यांनी अनुक्रमे ९८ टक्के गुण मिळवित घवघवीत यश प्राप्त केले.
जिल्ह्यातील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या सहा शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्सचे वेदांत नलगे, श्रद्धा गुलाक्षे यांनी ९७.२0, मानसी पुंडकर, साक्षी आळशी यांनी ९७, विक्रांत पाटील, गायत्री जाधव, योगेश राणे, ओम नरडे यांनी ९६.८0, हिमानी अग्रवाल, निलय चोपडे, श्रृती पाटील, नचिकेत महल्ले यांनी ९६ टक्के गुण प्राप्त केले. प्रभातच्या ध्रुव सारडा ९७.६, गायत्री मिश्रा ९७.४, हर्ष कुलकर्णी ९७.४, आदित्य राठी ९७.४, रसिका रहाने ९६.८, अंकुश पाटील ९६.६, सृष्टी म्हैसने ९६.६, ओम मानकर ९६.२, वेदांज बंकेवार ९६, अमिशा साहू ९६, साहिल वाडकर ९५.४, गायत्री धनोकार ९५.२, अथर्व दाबेराव ९५.२, महिमा जैन ९५, तनया काकड ९४.८ यांचा समावेश आहे. नोएल स्कूलच्या कोमल पवार ९७.२0 टक्के, साक्षी डाबेराव ९६.४0 टक्के, करिष्मा चव्हाण ९६.२0 टक्के, कविता इंगळे ९५.६0, श्रेयश डिकोंडवार ९५.६0, खुशी झिने ९५.२0, माधवराव सोनोने ९५ यांनी घवघवीत यश मिळविले आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या नितीन भांबरे याने ९५.२0 टक्के, ईश्वर पोटे ९४.६0, प्रणव बेलेकर ९३.४0, खुशी वाडेकर ९३ टक्के यांनीही यश मिळविले. त्याबरोबर कुंभारी येथील ज्युबिली इंग्लिश हायस्कूलच्या लावण्या पिंजरकर ९६, प्राची वाघमारे ९५.0८, मानसी साठे ९५.0४, प्रणव जोशी ९४.६, शिवांगी देशपांडे ९४.२, खुशी राऊत ९३.८, गायत्री पांडे ९३.२ यांनीही प्राविण्यश्रेणी प्राप्त केली. एमराल्ड हाइट्स स्कूलचे वैष्णवी राठोड ९७, शंतनु जावडे ९५.७, श्रृती कंकाळ ९५, तन्मय नवघरे ९४.८ यांनी घवघवीत यश संपादन केले.