अकोला,दि.15- कोविड रुग्णाच्या तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधनांनी तयार केली असुन त्यांना भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्चे लोकार्पण केन्द्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केन्द्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज अकोला येथुन ऑनलाईन केले.
ना. संजय धोत्रे याबद्दलची माहिती देतांना म्हणाले की, कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे कोविड चाचणी व तपासणी हेाणे गरजेचे आहे. यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोविड किट तयार केली असुन याची किंमत फक्त 399 रुपये आहे. याला लागणारा इत्तर खर्च मिळुन या किटची किंमत फक्त 650 रुपये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड टेस्ट होवून कोविडचे संक्रमणाचा फैलवावर प्रतिबंध होवू शकतो असे सांगून ना. धोत्रे पुढे म्हणाले की, यासाठी कोरोश्योर या कंपनीसह सहा कंपनींनी लायसन्स घेतले असुन या कंपनींनी 1 लाख किट्सचा मागे पाच हजार किट्स शासनाला मोफत देण्याचे अभिवाचन दिले आहे. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट्स निर्धारीत वेळेत तयार झाली असुन हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगुन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येवून आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करुन घ्यावा असे आवाहनही ना. धोत्रे यावेळी केले.