अकोट (देवानंद खिरकर)- मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार राज्यपाल यांनी 2020 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मधे अधिकारी प्रशासक न ठेवता गावातील नागरिकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे.मात्र गावातील नागरिक प्रशासक नियुक्त करतांना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी.अशी मागणी अखिल ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.पत्रकार हा सर्वांना सोबत घेणारा,बुध्दीजीवी,लोकशाहीचा 4 आधारस्थंभ आहे.याकरिता त्याच गावातील स्थानिक पत्रकारांवर ग्राम पंचायतचा प्रशासक पदाची जबाबदारी सोपवीली तर गटविकासच्या दृष्टीने महत्वाचे ठरू शकते.नियुक्त होणारे अधिकारी प्रशासक असलेले ग्रामपंचायतवर स्थानिक पत्रकारांना प्रशासकाची संधी द्यावी.अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने,राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाश बाप्पू देशमुख,यांनी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,ना.यशोमती ताई ठाकूर,यांनी ईमेलद्वारे पाठविले आहे.