मूर्तिजापूर (सुमित सोनोने):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशा ५० खाटांच्या दोन विलगीकरण कक्षाची कोरोना पृष्ठभूमिवर स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान येथे कुठल्याही वैद्यकीय सेवेचा अभाव नसल्याचे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सांगितले.
कोरोना विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून या विषाणूच्या संशयित अथवा बाधित रुग्णांसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात ५० खाटांची व्यवस्था केली असून, दोन व्हेंटीलेटल, चार सीपॅक मशीन, दोन अॉक्सिजन ट्रेसर सक्शन, दोन मल्टी पॅरामॉनिटर, दोन जम्बो अॉक्सिजन फिल्टर, चार पल्स अॉक्सिमीटर, एक इन्फॉरेड थर्मामीटर ने सुसज्ज करण्यात आला आहे. कोरोना संशयित रुग्णांसाठी ४६ बेड तर बाधीत रुग्णांसाठी चार बेडची (आयसीयूमध्ये) व्यवस्था करण्यात आली. या उपाययोजनेतंर्गत कोरोना बाधित व संशयित रुग्णांवर याच कक्षात उपचार करण्यात येत आहे आजमितीस येथे ८ कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. हा कक्ष कोरोना संशयीत व बाधित रुग्णांसाठी सुरु करण्यात आला असल्याने आतापर्यंत येथे उपचार घेतलेले सर्वच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनावर येथेच उपचार करण्यात येत आहे, आतापर्यंत १ हजार ५०० च्यावर रुग्ण तपासण्यात आले आहेत त्यामध्ये शहरितील व ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे, १हजार ३०० रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते पैकी शेकडो लोकांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. आतापर्यंत या विलगीकरण कक्षात बाधीत रुग्णांना काही कालावधीसाठी ठेवण्यात आले होते त्यामध्ये शहरातील एक व मंडूरा येथील पती-पत्नी अशा तिघांचा समावेश होता, ते बरे झाले आहेत. दरम्यान सोमवार पासून ८ नवीन बाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात आमची जातीने काळजी घेतल्या जात असल्याचे त्यांनी लोकमतला दुरध्वनीवरु माहिती दिली. विलगीकरण कक्षात वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून त्यांचा वापर होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पल्स अॉक्सिमीटर व इन्फॉरेड थर्मामीटरचा वापर नित्याने होत आहे.
—————————————-
रुग्णालयात ५० बेडचा कक्ष उभारला आहे. सोमवारपासून ८ रुग्णांना येथे दाखल करण्यात आले आहे, संशयित व बाधीत रुग्णांचा एकाच कक्षात उपचार केला जात असलातरी बाधितांसाठी चार बेडचा खास आयसीयू कक्ष देखील सज्ज तयार आहे.
डॉ. राजेंद्र नेमाडे
वैद्यकीय अधिक्षक, लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर
—————————————-
येथे दाखल झालो तेव्हा पासून वैद्यकीय यंत्रणा आमची विशेष काळजी घेत आहेत. दिवसभर औषधोपचार व इतर तपासण्याही करण्यात येत आहेत. जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था उत्तम प्रकारची आहे.
उपचार घेत असलेला एक पत्रकार रुग्ण