तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहर पुन्हा कोरोनाच्या एन्ट्रीने हादरले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सायंकाळच्या अहवालात एका नऊ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोरोना जम बसवू शकला नाही ते फक्त प्रशासनाच्या कामगिरीने व लोकांच्या सतर्कतेने मात्र काही प्रमाणात कोरोनाने आपल्या काही जणांना आवाक्यात मध्ये घेतले होते गेल्या दोन दिवसात कोरोनाने शहरात एन्ट्री केली असून ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे कार्यरत असलेल्या महिला परिचरिकेला(कोरोना योद्धा) कोरोनाची लागण लागल्याचे काल निष्पन्न झाले होते तर ह्याच परिचरिकेच्या नऊ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण लागल्याचे आज सायंकाळच्या अहवाल मध्ये स्पस्ट झाले असून सदर दोन्ही रुग्ण हे विलगिकरनात होते तर पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना याआधीच अकोला कोविड सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासन व पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.