अकोला,दि.14-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या आदेशानुसार, खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून आधार केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती-
सर्व आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये सामग्री व उपकरणे व परिसराचे निर्जतुकीकरण करुन घेणे आधार नोंदणी चालकास बंधनकारक राहील .केंद्र चालक व इतर ऑपरेटर यानी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. उदा. दर 20 तासांनी हात साबणाने धुणे, सॉनिटायझर वापरणे, तोंडाला मास्क किवास्वच्छ रुमाल वापरणे इत्यादी, आधारनोंदणी व दुरुस्ती केन्दामधील ऑपरेटर काम करताना नाक, तोड व डोळयांना स्पर्श होणार नाही याची आवश्यक दक्षता घेतील.ऑपरेटर व येणा-या नागरिकांनी पुर्णवेळ तोंडाला मास्कअथवा स्वच्छ रुमाल वापरावा, केवळ फोटो काढण्यासाठी मास्क काढण्यास परवानगी देण्यात येईल. आधार नोदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे.
आधार नोंदणी व दुरुस्तीकेंद्रामध्ये केंद्र व्यवस्थापक यांनी टेबल ऑपरेटर यांच्या बसण्याच्या जागे दरम्यान शारीरिक अंतर किमान एक मिटर असल्याचे सुनिश्चित करावयाचे आहे. अपॉइंटमेंट शिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिलीजावूनये. नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथेमोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे.नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला,ताप, कफ व श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादी सारखे लक्षणेआढळल्यास त्यांनी आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये न येणेबाबत फलक दर्शनी भागामध्ये लावावेत. प्रत्येक आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसारनागरिकांसाठी पत्रक दर्शनी भागात लावावेत.
आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये ऑपरेटरांनी कोव्हीड-१९ हॉटस्पॉटवर जाणे किंवा अशाभागातून प्रवास करू नये, प्रतिबंधीत क्षेत्रामधील (containment Zone) भागातआधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरुकरण्यात येऊ नयेत.जिल्हामध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती शिबीर घेण्यात येवू नयेत, आधारनोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीचे Thermal Scanning करावे वत्यांचीदैनदिननोंद ठेवावी.
वरील नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आल्यास किवाआदेशाचे पालनकोणतीही व्यक्ती अथवा संस्था शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानण्यात येवून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.