अकोला,दि.14-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 267 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 258 अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1910(1889+21) झाली आहे. आज दिवसभरात 45 रुग्ण बरे झाले. तर दोघांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 220 जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 14912 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 14446, फेरतपासणीचे 158 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 308 नमुने होते. आजपर्यंत एकूण 14841 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 12952 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 1910(1889+21)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज नऊ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाचहि पुरुष आहे. त्यात अकोट, गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर, करोली चोहटाबाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तरआज सायंकाळी प्राप्त अहवालात चारजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातदोन महिला व दोनपुरुष आहेत. यात कच्ची खोली, बोरगांव मंजू, तेल्हारा व सिरसो मुर्तिजापुर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
45 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, कोविड केअर सेंटर मधून 36, हॉटेल रिजेन्सी येथून तिन व ओझोन हॉस्पिटल मधून एक अशा 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय महाविद्यालयातून आज पाच जणांना घरी पाठविण्यात आले. त्यात चार महिला व एका पुरुष असून ते सिंधी कॅम्प येथील दोन तर जीएमसी होस्टल, अकोट, अमरावती येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड सेंटर मधून 36 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. यात पातुर येथील 10, बाळापूर येथील सात, बोरगांव मंजू येथील चार, पोळा चौक, सेंट्रल जेल व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तिन तसेच जेल क्वॉर्टर, डाबकी रोड, साई नगर, महान, मोठी उमरी व मालेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.
दोघांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात पातुर येथील 65 वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. ही महिला दि. 5 जुलै रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले आहे. तसेच माना ता. मुर्तिजापूर येथील 75 वर्षीय पुरुषाचा मुर्तिजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
220 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण 1910(1889+21) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील 97 जण (एक आत्महत्या व 96 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 1593 आहे. तर सद्यस्थितीत 222 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.