मुर्तिजापूर (सुमित सोनोने):- देशासह महाराष्ट्रमध्ये ही कोविड-१९ रुग्ण संख्या वाढत चालली आहे.त्याच्यात अकोला महाराष्ट्रात उंच उडी मारत आहे.त्याच्यात मुर्तिजापूर तालुका हा कोरोना रुग्णापासून वंचित होता परंतु आज एका पत्रकारा सोबत नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने मूर्तिजापूररात खळबळ उडाली आहे.
शहरात आज सकाळी एका युवा पत्रकारासह दोघांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुर्तिजापूर मधील आरोग्य, महसूल व नगर पालिका समन्वयक प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली होती.शहरात ता.११ जुलै रोजी संभाव्य कोरोना शोध मोहीम अंतर्गत नगर परिषद महसूल व आरोग्य प्रशासन समन्वयक सहभागातून येथील इंदीरा गांधी नगर परिषद विद्यालयात विशेष शिबीर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते.या शिबिरात एकाच दिवशी तब्बल १२५ नागरिकांचे स्वैब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी एका पत्रकारासह नऊ कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यानंतर मुर्तिजापूर शहर व तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. १२५ पैकी १२२ अहवाल प्राप्त झाले असून ३ प्रलंबित आहेत.एक माना येथील आहे.यामध्ये दोन महिला व सात पुरुष आहे. संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे.व इतर जे संपर्कात आले होते त्यांना कोविड सेंटरला पाठवण्यात आले व लोरीक्सवाले होम कॉरनटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.अशी माहिती मुर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी दिली आहे.