अकोला, दि.13– जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून अकोला जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.१५ ते १९ जुलै या कालावधीत करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी एकुण १५० पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यार आहे. या पदाकरीता पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, पदवीका, आयटीआय पास व पदवीत्तर पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करून आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करून सहभागी व्हावे. यामधून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्या ठिकाणावरून रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतात.
पात्र असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात तरी त्वरीत आपल्या सेवायोजन कार्डच्या आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधुन ऑनलाईन अर्ज करावे तसेच ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या दुरध्वानी क्रमांकावर ०७२४-२४३३८४९ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.