मुर्तिजापुर (सुमित सोनोने):- जातीय अत्याचारावर मुख्यमंत्री गप्प का ? असा सडेतोड सवाल विचारत आरपीआय(आठवले)च्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होऊन राज्यातील महाविकास आघाडीचा सरकारचा येथे आज आरपीआय कार्यकर्त्यांनी निषेध केला.
महाविकास आघाडीच्या काळात दलीत आणि बौद्धांवरील अत्याचार वाढल्याच्या निषेधार्थ आरपीआय(आठवले)चे शहराध्यक्ष अजय प्रभे यांच्या नेतृत्वात राज्य शासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणणाऱ्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या काळात राज्यात दलित व बौद्धांवरील अत्याचार वाढले आहेत. दलीतांची घरे जाळली जात आहेत, तरुणांच्या हत्या होत आहेत, हल्ले होत आहेत. लॉकडाऊन दरम्यानही हे प्रकार सुरुच होते, असे नमुद करणाऱ्या या निवेदनातून नाकर्ते राज्य शासन हे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत आसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रमोद किर्दक, शहराध्यक्ष अजय प्रभे, अर्जुन जामनिक,शैलेश मारवाल,प्रतिक जामनिक, रोहित आरेली,शंकर चव्हाण, प्रतिक प्रभे, गोलु वानखडे, शेखर प्रभे, विशाल प्रभे, पियुष प्रभे, सुरज वाघ, गजानन वाघ आदी कार्यकर्ते सहभागी झाले.
—————————————————————–
आमचे सर्वोच्च नेते नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मास्क लावून, सोशल डिस्टंसिंग चे पालन करून, शांततेत आम्ही निषेध आंदोलनात सहभागी झालो. सुटीचा दिवस असल्यामुळे निवेदन अॉनलाईन दिले. त्यांच्या आदेशानुसार पुढील आंदोलनाची दीशा ठरविण्यात येईल.
अजय प्रभे शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)मुर्तिजापुर