• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतः करू शकणार ‘ई पीक पाहणी’

पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होईल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Team by Team
July 11, 2020
in शेती, Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
यशोमती ठाकूर
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती, दि. 10 : शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने ‘ई पीक पाहणी’ हे मोबाईलवरील ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ऍपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सात बारावर करू शकणार आहेत.

विविध विभागांकडून अनेक योजना व कामांमध्ये अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार शासनाने पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 7/12 वर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते. सद्य:स्थितीत गाव नमुना 12 वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते. तलाठी यांचेकडील वाढत जाणारा कामाचा बोजा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक एखादे महत्वाचे काम करावे लागणे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदी घेणे यामध्ये विलंब लागू शकतो. त्यामुळे पीक नोंदीच्या आधारावर जी कामे शेतकऱ्यांना करावयाची असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने या प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली.

यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप तयार केले असून ते सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल वर प्ले स्टोअरमधून सहज घेता येणे शक्य आहे. या ॲपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या ॲपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकणार आहेत, शिवाय पिकाचा फोटो काढून तो ॲपवर अपलोड करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी यांच्या लॉग इन वर उपलब्ध होणार आहे, त्याला तलाठी यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या 7/12 वर तात्काळ होणार आहे, अशी माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

ई पीक पाहणी ॲप वरून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद केल्यास अचूक व गतीने माहिती संकलित होण्यास मदत होणार आहे. या माहितीचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पीक कर्ज, पीक विमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणे यामध्ये होणार आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात अचलपूर तालुक्यातील 23808 शेतकऱ्यांनी या ॲपच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे. तसेच तालुक्यातील हिवरा, दोनोडा, येसूरणा, येलकी, रायपुरा, भिलोना, वडगाव खु या गावात ई पीक पाहणी ॲप द्वारे उल्लेखनीय काम झालेले आहे. येत्या 15 जुलै पासून खरीप हंगामातील पीक पाहणीला सुरुवात होणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी ही फक्त या मोबाईल ऍपच्या माध्यमातून केली जाणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वतः करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ही नोंदणी ऑफलाईन व ऑनलाईन सुद्धा करता येणार आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी प्रत्येक गावात तलाठी व कृषी सहायक, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक दोन मंडळाला एक पालक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच गावपातळीवर सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार, महसूल मित्र, कृषी मित्र सेतू चालक, सामाजिक संघटना हे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढे येत आहेत. गावातील स्वतः पुढाकार घेऊन या प्रणालीचा वापर करणाऱ्या व यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा विशेष गौरव शासनाच्या वतीने केला जाणार आहे, तसेच सर्वाधिक ई पीक पाहणीचे काम करणाऱ्या गावाला सुद्धा विशेष पुरस्कार देण्याचे नियोजित आहे.हा प्रकल्प अचलपूर तालुक्यात यशस्वी व्हावा यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख हे गावपातळीवरील सर्व मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी सहायक, पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.

Tags: ई पीक पाहणीटाटा ट्रस्टमोबाईल ॲप
Previous Post

भर पावसात चोख कर्तव्य बजावणाऱ्या अकोला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याचे खुद्द गृहमंत्र्यांनी केले कौतुक

Next Post

ट्विटर, पिंट्रेस्टला मागे टाकत देशी स्टार्टअप ‘ट्रेल’ने घेतली आघाडी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
ट्रेल

ट्विटर, पिंट्रेस्टला मागे टाकत देशी स्टार्टअप 'ट्रेल'ने घेतली आघाडी

rajendra patode

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेत वाशीम जिल्हाधिका-यांनी लाभार्थीला वाटलेल्या जमिनीवर साडे सहा लाखाचा बोझा!,

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.