संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दूरध्वनीवरुन कोरिया गणराज्याचे संरक्षणमंत्री जोंग क्योंग-दू यांच्याशी संवाद साधला. दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी कोविड-19 महामारीसंदर्भात चर्चा केली. राजनाथसिंग यांनी जोंग क्योंग-दू यांना कोविड विरोधातील आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भारताच्या योगदानाविषयी माहिती दिली आणि महामारीविरोधातील जागतिक लढाईत परस्पर सहकार्याच्या क्षेत्रावर चर्चा केली. या महामारीमुळे निर्माण झालेल्या किचकट आव्हानांचा एकत्रित मुकाबला करण्यावर दोन्ही मंत्र्यांची सहमती झाली.
दूरध्वनी संवादादरम्यान, मंत्र्यांनी विविध द्वीपक्षीय संरक्षण सहकार्यासंबंधी पुढाकाराचा आढावा घेतला आणि सशस्त्र दलांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्याविषयी कटीबद्धता व्यक्त केली. तसेच दोन्ही देशांदरम्यान झालेले संरक्षण उद्योग आणि संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य करार भविष्यातही पुढे नेण्याविषयी सहमती झाली.
विविध प्रादेशिक सामायिक संरक्षणाच्या विस्तारयोजनांच्या उद्दिष्टांबाबत देवाणघेवाणही या दूरध्वनी संभाषणाच्यावेळी झाली.