तेल्हारा – कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेर गावांवरून मजूर येत असल्यामुळे तेल्हाऱ्यात सुरू असलेले सभागृहाचे काम बंद ठेवण्यात यावे अशी मागणी ९ जुलै ला तेल्हारा नगर परिषद चे विरोधी पक्ष नेते प्रहारचे शहर अध्यक्ष मितेश मल्ल यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून केली .
तेल्हारा नगर परिषद अंतर्गत हिवरखेड रस्त्यालगत सामाजिक सभागृहाचे काम चालू आहे या कामावर ४० ते ५० मजूर काम करीत आहेत सध्या कोरोनाच्या महामारीच्या पिरेड मध्ये शासनाने लावलेल्या कोरोना १९ च्या अटी व नियमांचे येथे कुठल्याच प्रकारे पालन केल्या जात नाही हे प्रत्यक्ष दर्शी व व्हिडीओ शूटिंग वरून निदर्शनास येते. सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती चालू असतांना सुध्दा संबधित कंत्राटदाराचे व्यवस्थापनाचे काम शासनाचे अटी व नियम बाजूला ठेऊन वेगाने चालू आहे .कामावरील मजुरांच्या तोंडाला कुठलाच मास्क अथवा रुमाल बांधलेला नसतो त्याच बरोबर सावधगिरी म्हणून कोणत्याच प्रकारचे स्यानिटायजरचा वापर केल्या जात नाही हे स्पष्टपणे दिसत आहे व कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंग सुध्दा दिसत नाही. सदर कामावरील सर्व मजूर अकोट शहरातील असून ते दररोज जाणे येणे करीत आहेत. सध्या अकोट शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र स्पष्ट असतांना मुख्याधिकारी यांनी संबंधित कंत्राट दाराला पत्र देऊन काम बंद ठेवण्याचे आदेश दयावे जेणेकरून तेल्हारा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही अश्या गंभीर परिस्थितीत सदर कामावर कोरोना बाधित आढळल्यास तेल्हारा शहरात त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो याला आळा घालणे शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य राहील याची स्थानिक प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी तेल्हारा नगर परिषद चे विरोधीपक्ष नेते मितेश मल्ल यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या कडे केली आहे तसेच निवेदनाच्या मागणीच्या प्रति पालकमंत्री ना. बच्चूभाऊ कडू , जिल्हाधिकारी अकोला ,तहसीलदार तेल्हारा व ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांच्याकडे दिल्या आहेत यावर आता मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तेल्हारा वासीयांचे लक्ष लागले आहे.