अकोला,दि.१०– जिल्ह्यातील कोविड-१९ बाधीत रुग्णांचा मृत्यूदर कमी व्हावा यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी अतिगंभीर कोरोना रुग्णांसाठी प्राणरक्षक Remdesivir या इंजेक्शनच्या २५ व्हॉव्हेल्स पाठविल्या आहेत. हे इंजेक्शन्स आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना हस्तांतरित करण्यात आले.
कोविड रुग्णांच्या उपचाराच्या विहित कार्यपद्धतीनुसार Remdesivir इंजेक्शनचा वापर अतिगंभीर स्वरुपातील रुग्णांवर करण्यात येतो. अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्याकरीता या इंजेक्शन्सचा वापर केला जाईल. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे इंजेक्शन्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत केले आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.