मूर्तिजापूर (सुमित सोनोने)- शहरातील वकिलपूरा परिसरात राहणाऱ्या ४० इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
स्थानिक वकीलपुरा भागात राहणाऱ्या श्रीकृष्ण दयाराम अवघाते वय ४० वर्ष यांनी स्वतःच्या घराच्या छताला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आत्महत्या चे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आत्महत्येच्या वेळी पत्नी व मुले हे माहेरी गेलेली असल्याने आत्महत्या का केली आणि कशामुळे याचा तपास शहर पोलीस करीत असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.