वाडेगाव (डॉ चांद शेख)- प्रहार जनशक्ती पक्षाच्या रेट्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला दिव्यांग बांधवांचा राखीव निधी वाटप करण्यास भाग पडले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री, अकोला पालकमंत्री नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग बांधवांचा मागील काही वर्षाचा तीन टक्के व 2018 पासूनचा पाच टक्के राखीव निधी प्रहारच्या पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला व ग्रामसेवक अंभोरे व सरपंच अन्नपूर्णा ताई मानकर यांना वाटप करण्यास भाग पडले व त्यांनी तात्काळ वाडे गावातील 129 दिव्यांग बांधवांना पहिल्या टप्प्यात मानसी एक हजार रुपये दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यामध्ये टाकले व लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित अपंग बांधवांच्या वाटप करणार आहेत काही दिव्यांग बांधव आपले बँक खाते क्रमांक ग्रामपंचायतला देऊ शकले नाही त्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते नंबर ग्रामपंचायतला द्यावे कुणीही दिव्यांग बांधव लाभापासून वंचित राहणार नाही वाडेगावातील प्रहार कार्यकर्ते राधेश्याम कळसकार ,नामदेवराव कराळे ,केशव फुंडकर, संतोष लोखंडे , चैतन दशमुखे, तुषार बेलोकार ,उमेश मानकर ,सुनील डोंगरे ,देवानंद वाडे, मानोज चिंचोलकार यांनी दिव्यांग बांधवांना निधी मिळवून देण्यासाठी काम केले या प्रहार कार्यकर्त्यांचे ग्रामसेवक अंभोरे यांनी आभार मानले