पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या अंतर्गत 81 कोटी लोकांना 203 लाख टन धान्य दिले जाईल. त्यांनी माहिती दिली की मागील 3 महिन्यात गरीबांना 120 लाख टन धान्य वाटण्यात आले. या दरम्यान 4 लाख 60 हजार टन डाळ आणि 9 लाख 70 हजार टन चनाडाळ देण्यात आली.
कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय –
- उज्वला योजनेंतर्गत मिळणाऱ्या 3 घरगुती सिलेंडरचा कालावधी सप्टेंबर महिन्यापर्यंत करण्यात आलेला आहे. यासाठी 13500 कोटी रुपये खर्च येईल. याचा फायदा 4 कोटी महिलांना होईल.
- कॅबिनेटने ईपीएफ शेअरिंग 24 टक्क्यांना तीन महिने वाढवून जूनवरून ऑगस्ट केले आहे. यासाठी अंदाजे खर्च 4 हजार 860 कोटी रुपये येईल. याद्वारे 72 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
- ओरिएंटल कंपनी लिमिटेड, नॅशनल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड आणि यूनायटेड इंडिया इंश्योरेंस कंपनी लिमिटेडसाठी 12450 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे.
- कॅबिनेटने गरीब आणि शहरी स्थलांतरितांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अफॉर्डेबल रेंटल हाउसिंग कॉम्प्लेक्सला मंजूरी दिली आहे. या अंतर्गत लाखो घरांचे निर्माण केले जाईल.
- सरकारने कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी 1 लाख कोटींचा निधी मंजूर केला आहे.