मुर्तिजापूर (सुमित सोनोने):- वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने २ जुलै रोजी प्राप्त आदेशानुसार संपूर्ण जिल्हा , तालुके , शहर व महानगर कार्यकारणीच्या नव्याने नियुक्ती कार्यक्रम राबविला जाणार असून त्यानुसार लवकरच कमिट्या गठित करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केली आहे.महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्राप्त आदेशानुसार जिल्हाध्यक्ष ह्यांनी संपूर्ण जिल्हा,तालुके,शहर व महानगर कार्यकारिणीच्या नव्याने नियुक्ती करण्याचे काम त्वरित हाती घेण्यात येत आहे.
त्याबाबत आज अकोल्यात पक्षनेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांची परवानगी घेण्यात आली आहे. त्यानुसार कमिट्या तयार करण्यासाठी पंचायत समित्या गण जिल्हा परिषद सर्कल,तालुका कार्यकारण्या व तालुका , शहर , महानगर व वार्ड शाखा करिता गठण कार्यक्रम लवकर जाहीर करून त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ह्याच महिन्यात पूर्ण करावयाची असल्याने बैठकीबाबत आराखडा लवकर जाहीर केला जाणार आहे. त्यानुसार ज्यांना ज्यांना पंचायत समित्या गण,जिल्हा परिषद सर्कल,तालुका कार्यकारण्या व तालुका शहर , महानगर व वार्ड शाखा मध्ये काम करावयाची इच्छा आहे त्यांना रितसर अर्ज देऊन संपूर्ण माहिती भरून घेतली जाईल.ह्या मधून प्रस्तावित कार्यकरण्या केंद्रीय कार्यालयास पाठवून प्रदेशची मान्यता घेऊन जाहीर करण्यात येतील. सोबतच प्रदेश च्या वतीने दिलेल्या आदेशानुसार पक्षाच्या नावाने चिन्ह वापरून कोणताही कार्यक्रम घेताना त्याला जिल्हाध्यक्ष यांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सबब पक्षाचे नावावर ह्या पुढे कार्यक्रम करताना तो जिल्हाध्यक्ष म्हणून मला अवगत केल्याशिवाय राबवु नये जेणेकरून आपसात गैरसमज होणार नाहीत. असे वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिरोळे यांनी कळविले आहे.