अकोला (प्रतिनिधी)- जानेवारी ते जून ह्या सहा महिन्यांची मागील 10 वर्षाची आकडेवारी पाहता ,शहर वाहतूक शाखेने ह्या वर्षी सन 2020 च्या जानेवारी ते जून ह्या संपलेल्या 6 महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही चा उच्चाक केला असून आता पर्यंत शहर वाहतूक शाखा स्थापन झाल्या पासून सर्वोच्च दंडात्मक कार्यवाही केली आहे, उपलब्ध आकडेवारी नुसार मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये केलेल्या दंडात्मक कार्यवाहीची आकडेवारी पाहता सन 2013 च्या जानेवारी ते जून ह्या सहा महिन्यात केलेल्या एकूण दंडात्मक कार्यवाहीची संख्या होती 16,140, सन 2014 मध्ये 16,446, सन 2015 मध्ये21,402, सन 2016 मध्ये 28,668 ,सन 2017 मध्ये 27,201, सन 2018 मध्ये 30,655 , मागील वर्षी सन 2019 मध्ये जानेवारी ते जून ह्या सहा महिन्यात दंडात्मक कार्यवाही चा आकडा होता 35,480 व ह्या वर्षी जानेवारी ते जून ह्या सहा महिन्यात दंडात्मक कार्यवाही चा आकडा होता 39, 120 .
ह्या वर्षी करोना महामारी मुळे 22 मार्च पासून संपूर्ण लॉक डाऊन घोषित झाले होते त्या मूळे जवळपास 2 महिने रस्त्यावर वाहने सुद्धा विशेष धावत नव्हती हे विशेष, तरी सुद्धा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी लॉक डाऊन च्या काळात सुद्धा वाहने चेकिंग ची धडक मोहीम राबवून हजारो वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली व जवळपास 2000 वाहने जप्त सुद्धा करण्यात आली, दरम्यान लॉक डाऊन च्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर शहराच्या विविध पोलीस स्टेशन मध्ये जवळपास 37 गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले, जानेवारी ते जून ह्या सहा महिन्यात जवळपास 39, 000 वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करून 35 लाख रुपयांचे वर दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला.
*22 मार्च पासून लॉक डाऊन सुरू झाल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते, अश्या वातावरणात ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन धडक कारवाई करून लॉक डाऊन च्या 3 महिन्यातच भर उन्हाळ्यात 26, 000 दंडात्मक कारवाया केल्या
गजानन शेळके
पोलीस निरीक्षक
शहर वाहतूक अकोला