• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सीबीएसईचा 2020-2021 च्या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम केला जाहीर

मूलभूत संकल्पना शिकवण्याचे महत्व लक्षात घेवून अभ्यासक्रम 30 टक्क्यांपर्यंत तर्कसंगत करण्याचा निर्णय - मनुष्यबळ विकास मंत्री

Team by Team
July 8, 2020
in Featured, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 0
0
सीबीएसईचा
15
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

संपूर्ण जगभरामध्ये आणि देशातही कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला 2020-2021च्या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यासक्रम थोडा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार आज मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सीबीएसईचा इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला.

काही आठवड्यापूर्वीच सर्व शिक्षण तज्ज्ञांना अभ्यासक्रम कमी करण्याविषयी सूचना करण्याचे आवाहन समाज माध्यमांद्वारे करण्यात आले होते. अभ्यासक्रमाविषयी ‘हॅशटॅगसिलॅबसफॉरस्टुटंड 2020’ यावर 1.5 हजारांपेक्षा जास्त सूचना आल्याची माहिती निशंक यांनी यावेळी दिली. मंत्रालयाच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आलेल्या सूचनांचा विचार करून प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी नियुक्त केलेली समिती आणि मंडळाच्या प्रशासकीय मान्यतेनंतर आता सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

संपूर्ण जगामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शिक्षणाचा विशिष्ट स्तर-दर्जा कायम राहावा, हे लक्षात घेवून मुलांना मूलभूत संकल्पना शिकवणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. त्यामुळे शक्य तितकाच अभ्यासक्रम कमी करून तर्कसंगत केला आहे, असे निशंक यांनी सांगितले.

अभ्यासक्रमातून जी प्रकरणे वगळण्यात आली आहेत, त्याची परीक्षा घेण्यात येणार नसली तरीही मुलांना शक्य असेल तेंव्हा ती प्रकरणे समजावून सांगावीत, असा सल्ला सर्व शाळांच्या प्रमुखांना आणि शिक्षकांना देण्यात आला आहे. कारण पुढच्या शिक्षणामध्ये त्या प्रकरणांविषयी प्राथमिक माहिती मुलांना असणे गरजेचे असते. तथापि कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचे अंतर्गत मूल्यांकन किंवा वर्षाखेरीस होणा-या बोर्डाच्या परीक्षेसाठी विचार करण्यात येणार नाही. पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका आणि एनसीईआरटीच्या वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतींचा वापर करून अध्यापनशास्त्रानुसार शिकवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्राथमिक वर्ग चालवणाऱ्या (इयत्ता पहिली ते आठवी) शाळांनी एनसीईआरटीने निर्दीष्ट केलेल्या वैकल्पिक शैक्षणिक दैनंदिनी आणि शैक्षणिक परीक्षण पद्धतीनुसार कार्य करावे, असे सुचविण्यात आले आहे. आज जाहीर करण्यात आलेला सुधारित अभ्यासक्रम सीबीएसईच्या शैक्षणिक संकेतस्थळावर www.cbseacademic.nic.in उपलब्ध आहे.

Tags: अभ्यासक्रमशिक्षणसीबीएसई
Previous Post

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला सीमा भागातील पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा

Next Post

नागपूर मनपाच्या ६० विद्यार्थ्यांना शहरातील खासगी कोचिंग क्लासेस देणार ‘जेईई’ आणि ‘नीट’चे धडे

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
कोचिंग

नागपूर मनपाच्या ६० विद्यार्थ्यांना शहरातील खासगी कोचिंग क्लासेस देणार ‘जेईई’ आणि ‘नीट’चे धडे

अकोला शहर वाहतूक शाखे

अकोला शहर वाहतूक शाखेचा दंडात्मक कार्यवाहीचा नवा उच्चांक, मागील १० वर्षातील कारवायांच्या तुलनेत सर्वात जास्त कारवाया यावर्षी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.