• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सत्त्वपरीक्षा सरकारची अन् विद्यार्थ्यांचीही

Team by Team
July 8, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 1
0
परीक्षा
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :

देशातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि स्वायत्त विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा जुलै महिन्यात घ्यायच्या असल्यास त्या ऑनलाईन घेता येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्पष्ट करण्यात आले आहे. ऑगस्ट तसेच सप्टेंबरमध्ये स्थितीत सुधारणा झाल्यानंतर विद्यापीठांना त्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन, ऑफलाईन तसेच दोन्ही प्रकारे परीक्षा घेता येणार आहेत. अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी ‘यूजीसी’च्या आपत्कालीन बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांन्वये परीक्षांचे आयोजन करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये भौतिक दुरत्व ठेवण्यासह मास्क वापरणे तसेच ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक राहणार आहे, अशी माहिती ‘यूजीसी’कडून देण्यात आली आहे.

जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक विश्वासार्हता, करिअरची संधी तसेच भविष्याची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण प्रणालीत शैक्षणिक मूल्यांकन आवश्यक आहे. परीक्षेतील कामगिरीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांना समाधान मिळते, अशी भूमिका ‘यूजीसी’ने मांडली आहे.

अंतिम सत्रांव्यतिरिक्त इतर सत्रांचे निकाल गतवर्षीचे गुण तसेच अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे घोषित केले जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये आयोजित परीक्षादेखील एखादा विद्यार्थी देऊ शकला नाही, तर विद्यापीठ त्यांना विशेष संधी उपलब्ध करवून देईल. सामान्य कॉलेजसह व्यावसायिक, तांत्रिक कॉलेज तसेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश ‘यूजीसी’कडून देण्यात आले आहेत. कोरोना महारोगराईच्या संकट काळात शैक्षणिक सत्रांच्या रखडलेल्या परीक्षांसंबंधी ‘यूजीसी’ने आपत्कालीन बैठक बोलावली होती. बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानंतर ‘यूजीसी’ने हरियाणा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.

समितीच्या अहवालाआधारे परीक्षा घेण्याला मंजुरी देण्यात आली आहे. सोमवारी गृह मंत्रालयाने केंद्रीय शिक्षण सचिवांना पत्र पाठवून अंतिम वर्षांतील परीक्षा घेणे आवश्यक असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मानक कार्यप्रणालीचे पालन करीत परीक्षा घेण्याची परवानगी प्रदान केली आहे. ‘यूजीसी’च्या निर्देशांनुसार प्रत्येक विद्यापीठ तसेच महाविद्यालयांना अंतिम वर्षांतील परीक्षांचे आयोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचना येण्यापूर्वीच अनेक महाविद्यालये तसेच विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर परीक्षांसंबंधीचा निर्णय घेतला होता.

परीक्षेचा वाद हायकोर्टात

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या भादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परिक्षा रद्द करण्याबरोबरच परीक्षा आणि मूल्यांकन बाबत निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला नाही. असा दावा करून पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती न्यायमूर्ती ए ए सय्यद आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आठवडाभरात भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहे.

पुण्यातील एका निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांच्यावतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. वारूंजिकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयालाच जोरदार आक्षेप धेतला. राज्य सरकारला राज्य सरकारला परीक्षा आणि मूल्यांकनबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही,तर विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे अथवा रद्द करण्याचे अधिकार आहेत असा दावा केला. तसेच राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले असून कोरोना मुळे एका गटाची परीक्षा रद्द केली आहे.

Tags: अंतिम वर्षांच्या परीक्षापरीक्षा
Previous Post

जिल्हयातील १२ जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू,आकडा १७९१ पार

Next Post

बहुचर्चित वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार- छगन भुजबळ यांची माहिती

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
छगन भुजबळ

बहुचर्चित वैष्णवी गोरे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार- छगन भुजबळ यांची माहिती

illegal liquor

वरुळ जऊळका येथे दारूविक्रेत्याची दादागिरी खुलेआम मंदिर परिसरात अवैध दारुची विक्री

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.