अकोला (डॉ चांद शेख)- जिल्हा परिषद सभागृह अकोला येथे स्थायी समितीची सभा संपन्न झाली या सभेमध्ये तेल्हारा येथील 42 शिक्षकांच्या वेतनातून टाय, बेल्ट, शुज खरेदी प्रकरणात समायोजन सादर न केल्यामुळे कपात झालेल्या 4लाख 17 हजार रुपयांच्या बाबतीत जिप सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी शिक्षणाधिकारी यांना कपात का ? व कशासाठी ? केली व कोणतीही चौकशी न करता कपात केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात तसेच कपात केलेली रक्कम तीन दिवसात शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याबाबत मागणी केली, यावेळी विरोधी पक्षनेते गोपाल दातकर, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, गजानन पुंडकर यांनी सभागृहात यासंदर्भात विचारणा केली व सभागृहाला चौकशी करुण कपात केलेले वेतन जमा करावे अशी मागणी केली यावर शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना दोषी ठरवून सात दिवसाच्या शिक्षकांचे कपात केलेले वेतन जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सभागृहाला सांगितले व दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले!!!