तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या व कब्रस्थान च्या विकास कामांन मध्ये भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रार नागरिकांनी केली असून चौकशीची मागणी सुध्दा त्यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी अकोला व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांच्या कडे केली असल्यामुळे सर्वत्र खडबड उडाली आहे.
तेल्हारा नगर परिषद च्या माध्यमातून अनेक दिवसांपासून विदर्भात सर्वात सुंदर वैकुंठ धाम( स्मशानभूमी) ची निर्मिती करण्यात आली आहे. त्या मध्ये अधिक सुधारणा म्हणून नगर परिषद ने विकास कामे सुरू केली व काही पूर्ण झाली त्या विकास कामांन मध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी करून भ्रष्टाचाराच्या चौकशी बाबत कंत्राटदारावर काय कारवाई करावी या बाबत काही दिवसांच्या अंतराने पुन्हा मुख्याधिकारी यांच्या कडे तक्रार देऊन नागरिकांनी मागणी केली आहे. तसेच मुस्लिम कब्रस्थान मध्ये सुध्दा ठेकेदार स्वतःच्या मर्जीनुसार काम करीत आहे त्यामुळे याही कामा मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे नागरिकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. स्मशानभूमीच्या व कब्रस्थान च्या कामात भ्रष्ट्राचार झाला असून सदर कामे अंदाजपत्रका नुसार झाली नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे या सर्व कामांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ना. बच्चू भाऊ कडू पालकमंत्री अकोला, जिल्हाधिकारी अकोला व मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांच्या कडे करण्यात आली आहे करण्यात आलेल्या तक्रारीवर रोहित पवार ,प्रशांत वाळके इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.या पूर्वी सुध्दा एका नगर परिषद सदस्य यांनी तेल्हाऱ्यात सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या कामाबाबत तक्रार केली असल्याचे समजते तरी नागरिकांनी केलेल्या भ्रष्टाचारा बाबत नगर परिषद चे अधिकारी व पदाधिकारी काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरशैव लिगायत स्मशानभूमीचे काम निकृष्ट दर्जाचे,विरशैव लिगायत समाजाचा आरोप
*पहिल्याच पावसात पडल्या आवार भिंता
तेल्हारा नगर परिषद च्या माध्यमातून सुरू असलेल्या विरशैव लिगायत स्मशानभूमीचे बांध काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून पहिल्याच पावसात आवार भिंता पडल्यामुळे काम दर्जेदार झाल्याशिवाय व बांधकामाची पळताळणी केल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराचे देयक देऊ नये अशी मागणी विरशैव लिगायत समाजाच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे या मुळे , या पूर्वी स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कोठा रस्त्यावर तेल्हारा नगर परिषद च्या माध्यमातून विरशैव लिगायत स्मशानभूमीचे बांध काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून पहिल्याच पावसात स्मशानभूमीची आवार भिंत वाहून गेली स्मशानभूमीच्या कामा बाबत अधिकाऱ्यांना तोंडी तक्रारी करून सुध्दा प्रशासना मार्फत कुठलीच दखल घेण्यात आली नाही तरी सदरहू स्मशानभूमीच्या जागेत आमच्या समाजाच्या श्रीमती शांताबाई मिटकरी यांचा दफनविधी दि . २१ ,०६, २०२० रोजी करण्यात आला परंतु आवार भिंत कोसळून
स्मशानभूमीच्या जागेत पाणी शिरल्यामुळे सदरहू समाधीवरची माती वाहून गेल्यामुळे आमच्या अस्मितेला धक्का पोहचला त्यामुळे सदर काम लक्ष पूर्वक करून घेऊन दर्जेदार करून घेण्यात यावे सदरहू कामाचे ऑडीट व पूर्ण तपासणी करून च कंत्राटदाराचे देयक काढण्यात यावे व या नंतर समाधीची कुठलीही विटंबना झाल्यास नगर परिषद प्रशासनाला जबाबदार धरून तिव्र आंदोलनाची भूमिका समस्त विरशैव समाजा मार्फत घेण्यात येईल असा इशारा सुध्दा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर विरशैव लिगायत समाजाचे अमोल बिडवे,सुमित गंभीरे, कैलास बोडखे, गौरव धुळे , राहुल मिटकरी , योगेश बिडवे, विजय मुजाळे,दिलीप मुंजाळे, मलकार्जुन कुंभारे, सुरेश पिंपळकार , तुकाराम घोडेस्वार , सुनिल घोडेस्वार , राहुल बोडखे, सिध्देश्वर घोडेस्वार , मयूर, बसवेश्वर आप्पा मिटकरी इत्यादी विरशैव लिगायत समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत . स्मशानभूमीच्या कामांन मध्ये भ्रष्टाचार ,गैरप्रकार इत्यादी आरोप एक नव्हे तर अनेकांन कडून होत असताना नगराध्यक्ष सह अधिकाऱ्यांची चुप्पी कश्यासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.