मुर्तिजापूर (सुमित सोनोने)-
अकोला जिल्ह्यातील हिंगणा गावचे कबड्डीपटु गजानन तायडे यांच्या अल्पशा आजाराने जुन महिन्यात मुत्यु झाला होता. व त्यांच्या मुत्यु नंतर सदर कुटुंब आर्थिक परिस्थीत नाजुक असल्यानेमैत्री ग्रुप च्या कबड्डीपटूनी त्यांच्या कुटुंबाला भरीव अशी आर्थिक मदत दिली. गजानन तायडे हे कब्बड्डी मध्ये नावलौकिक असे खेळाडु होते .त्यांच्या जान्यामुळे हिंगणा गावावर व अकोला जिल्ह्यातील खेळाडू दुःखाचा डोंगर कोसळला आहे . कमी वयात त्यांनी अनेक सामने जिंकुन दिले उंच भरारी घेतली होती , व त्यांनी स्वताची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या परीवारासाठी ति अर्थिक भरीव मदत मैत्री कबड्डी या ग्रुप कडुन जमा करून देण्यात आली .हि अकोल्यातील कब्बड्डी क्षेत्रातील अभिनव उपक्रम मैत्री ग्रुप व्दारे राबविण्यात आला . सदर गजानन तायडे हे कब्बड्डी पट्टू असल्याने अकोल्या जिल्ह्यातील व मैत्री ग्रुप च्या सदस्यांनी मिळुन मदत केली .त्यांच्या मुळे त्यांच्या घरच्यांना पण एक आधार मिळाला व त्यांच्या घरच्यांना खुप छान वाटले की, गजानन चे एवढे मित्र घरी भेटायला आले. या निमित्ताने सर्व कबड्डी चे जुने मित्र जे 10 ते 15 वर्षानंतर एकमेकांना भेटले. या कार्यक्रमात सर्वांनी वेळात वेळ काढून कब्बड्डी पटुनी उपस्थिती लावली होती व त्या त्याबद्दल सर्वांचे आभार सुध्दा /यावेळी मान्यात आले.तसेच या आर्थिक मदतीच्या योगदानात दिलीप तायडे , अमित बुले , पुरुषोत्तम देशमुख , संजय लावूडकर ,निळू लांडे , पंडित देशमुख , जावेद शहा , संतोष साळके , पिंटू तोमर , संतोष देशमुख , संदीप तायडे , ईश्वर चोपडे , कपिल चोपडे , अजाबराव तायडे , पवार साहेब , कुणाल शेळके , प्रशांत चरोडे , निलेश सुरळकार , नितीन भाऊ मारके , रफिक शाहा , चरण शिरसाट , रवी बावणे, शैलेश देशमुख , संतोष खेडकर, आकाश मानकर , विजय सोलकर , रामदास आंपतकर , अनिल निंबोळकर , लखन निंबोळकर , राम शेळके , दिनेश शहा , निलेश मानकर , रुपेश इंगळे , तेजराव बोरसे, सय्यद मकसूद , रामदास वानखडे , इत्यादी सदर कुटुंबातील लोकांना मदत दिली. सदर या करिता रूपेश इंगळे आणि पुरूषोत्तम देशमुख यांनी खुप परिश्रम घेतले व मैत्री कब्बड्डी ग्रुप च्या वतीने हे काम असेच सुरू राहील असे यावेळी सांगण्यात आले.