अकोला (प्रतिनिधी)- नव्यानेच अकोला येथे रुजू झालेले पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी सर्व पोलीस कर्मचारी ,अधिकारी ह्यांना दुचाकीवर हेल्मेट सक्ती केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट खरेदीसाठी पुरेसा वेळ दिल्या नंतर आज पासून शहर वाहतूक शाखेने चेकिंग मोहीम सुरू केली असून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांना दंडात्मक कार्यवाहिला सामोरे जावे लागेल असा इशारा शहर वाहतूक प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे, शहर वाहतूक शाखेच्या ह्या मोहिमे मुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून आज पोलीस कर्मचारी हेल्मेट परिधान केल्याचे दिसून येत होते, ज्या पोलीस कर्मचार्यांकडे अजूनही हेल्मेट नाही ते खरेदी करण्यासाठी धाव घेतांना दिसून येत होते,बरेच पोलीस कर्मचारी जवळच्या पोलीस स्टेशन ला नेमणुकीस असल्याने व शैक्षणिक व इतर कारणाने कुटुंब अकोला येथे असल्याने मोठ्या प्रमाणावर अकोला वरून येणे जाणे करतात अश्या कर्मचाऱ्यांची हेल्मेट खरेदी साठी पोलीस साहित्य मिळणाऱ्या दुकानावर गर्दी दिसून आली, सदर मोहीम ही पोलीस कर्मचारी अधिकारी ह्यांचे अपघाता पासून जीविताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालावे अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे