मूर्तीजापुर (सुमित सोनोने):-
मूर्तीजापुर तालुक्यात लाॅकडाऊन च्या काळात आर्थिक परिस्थिती ढासळली असतांना विज वितरण कंपनीने आता ग्राहकांना पाठवलेले विज बद्दल विषयी नागरिक चिंतेत पडले आहे.
आधीच पोट भरने कठीण झाले तर विज देयक कुठून भरावे प्रश्न सर्वसामान्यांमध्ये पडला असतांना यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील जळमकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दरबारात सर्व कैफियत आपल्या निवेदनाद्वारे मांडली आहे.वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासानाने२५ मार्च पासून लॉकडाउन सुरू केले वीज वितरण कंपनीने या काळात वीज मीटर रिडींग घेतले नाही. मे महिन्याचा सरासरी वीज बिल ऑनलाईन पाठवून दिले मात्र जून महिन्याचा वीज ग्राहकांना घाम फुटला.अशावेळी दारिद्र्यरेषेखाली येणारे नागरिकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढले वीज वितरण कंपनीने आपली मनमानी चालून थेट ग्राहकांना तीन महिन्याचा वीज बिल हजार रुपयाच्या रकमेत जाहीर केला आहे.
मागील चार महिन्यापासून सतत लॉकडाऊन असल्याने मोलमजुरी करणाऱ्यांच्या हाताला काम नाही बेरोजगारीचा प्रमाण वाढला आहे तर दुसरीकडे कोरोना प्रादुर्भावची दहशत निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत या दारिद्र्याचे केले येणारे गरिबांनी कुठून वीज देयकची भरणा करावा सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा जीवन जगणे कठीण झाले आहे. घरातील प्रपंच चालवणे कठीण आहे. असे विविध समस्या त्यांचे समोर निर्माण झाले आहे. शासनाने त्वरित पावले उचलून यासंदर्भात गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील येणारे नागरिकांना दोन रुपये युनिटप्रमाणे वीज दर लावण्यात यावे केव्हा दोन महिन्याचा वीज बिल माफ करण्यात यावे जेणेकरून सर्व सामान्यांना आधार मिळेल याकरिता शासनाने त्वरित निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी समाजिक कार्यकर्ते संदीप जळमकर यांनी या निवेदनात केली आहे.