अकोला जिल्ह्यात रोजी सकाळी आलेल्या अहवालात ४७ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोल्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १६६४ एवढी झाली आहे.
शनिवारी सकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे २०४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १५७ अहवाल निगेटिव्ह तर ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या १६६४ झाली आहे. यातील १२२२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३५५ क्रियाशील रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी प्राप्त अहवालात ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात १५ महिला व ३२ पुरुष आहेत. त्यातील पातूर १४, बाळापूर १२, खोलेश्वर ४, अकोट ४, लहान उमरी, डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी २ तर बार्शी टाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तिघेही पुरुष असून त्यातील एक जण बाळापूर येथील ३६ वर्षीय व्यक्ती आहे. हा व्यक्ती २३ जून रोजी दाखल झाला होता. त्याचा काल (दि. ३) रोजी रात्री मृत्यू झाला. तर दुसरा ७२ वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून हा व्यक्ती दि. २ रोजी दाखल झाला होता. तर अन्य तिसरा एक ७२ वर्षीय व्यक्ती खैर मोहम्मद प्लॉट येथील असून हा व्यक्ती २९ जून रोजी दाखल झाला होता. या दोघांचा आज पहाटे मृत्यू झाला.