• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

१८५ अहवाल प्राप्तः १० पॉझिटीव्ह, २२ डिस्चार्ज, एक मयत

Media Desk by Media Desk
July 3, 2020
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
corona
23
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  १८५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७५ अहवाल निगेटीव्ह तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १६१७  झाली आहे. आज दिवसभरात २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ११६८८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११३१९, फेरतपासणीचे १४९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२० नमुने होते. आजपर्यंत एकूण ११६३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १००२१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६१७ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आज  पॉझिटिव्ह

आज दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. ते पातूर, मोठी उमरी, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद जि. बुलडाणा(हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे),  बार्शी टाकळी,  बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह असून त्यात तिघे पुरुष आहेत. ते आडगाव तेल्हारा व मोठी उमरी ( हे दोन्ही रुग्ण जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत.) व अन्य एक सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

२२ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. हे रुग्ण लक्कडगंज, संदीप सोसायटी,  दगडी पुल, हैदरपूरा व बाळापूर येथिल रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर आज सायंकाळी कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार जण हरिहर पेठ येथिल, चार जण अकोट फैल येथील तर  तीन जण तार फैल, दोन जण भिमनगर, दोन जण गुलजारपुरा तर खडकी व अनिकट पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.

 एक जण मयत

दरम्यान  आज पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मयत रुग्ण हा ६५ वर्षीय पुरुष असून  शंकरनगर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.२३ जून रोजी दाखल झाला होता.  त्याचा आज पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

३११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत  एकूण १६१७ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८४ जण (एक आत्महत्या व ८३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२२२ आहे. तर सद्यस्थितीत ३११  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृहात अशासकीय कर्मचाऱ्यांची भरती

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विभागीय आयुक्त पियुष सिंह

विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

akola news

मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर; महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.