अकोट (देवानंद खिरकर )- अकोट शहरात कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखडी तोडण्यासाठी कडक पावले उचलल्या गेले आहे. शहरात रूग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढत जात असल्याने यावर प्रतिबंध घालण्यासाठी १ जुलै रोजी पंचायत समितीच्या सभागृहात अकोला पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक पार पडली.यामध्ये अकोट शहरात ३ जुलै ते ९ जुलै पर्यंत सात दिवस जनता कर्फ्यू चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले होते.अकोट शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३४ आहे यामध्ये २७ सक्रिय , २ मयत, ५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत आज अकोट शहरामध्ये जनता कर्फ्यू ला व्यापारी नागरिक यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.अत्याआवश्यक सेवा वगळता अकोट शहरातील संपूर्ण बाजारपेठ दुकाने पूर्णपणे कडकडीत बंद होती. अकोट मधील सर्वपक्षीय नेते अकोट प्रशासन जनतेला आव्हान करताना दिसत आहे.